India vs Sri Lanka, ODI Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आता दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल तर श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 94 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे.
मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी भारत विजयी
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वात आधी नाणफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुिळे भारतीय संघ आधी फलंदाजीला आला. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाने नाबाद 108 धावा ठोकत एक कडवी झुंज दिली, पण संघाला विजयी करण्यासाठी ही पुरशी नसल्याने अखेर श्रीलंका संघ पराभूत झाला.
कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
अशी असू शकते भारताची अंतिम 11
सलामीवीर -शुभमन गिल, रोहित शर्मा
मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर
ऑलराउंडर- अक्षर पटेल, हार्दिक पांड्या
गोलंदाज - मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, युजवेंद्र चहल
हे देखील वाचा-