Pune Marathon : देशामध्ये पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला काल रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. देशात प्रथमच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा या वेळी रात्री घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. मात्र ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह मात्र आजिबात कमी नव्हता.
पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
या पुण्याच्या मॅरेथॉनला देश-विदेशातून मॅरेथॉनपटू येत असतात. यावर्षी देखील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये परदेशातील 30 धावपटू व देशातील 2500 धावपटू सहभागी झाले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर महिलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आज सकाळी मुंबई काँग्रेसतर्फे महिलांसाठी "लडकी हूँ लड़ सकती हूँ " या नावाने महिलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनमध्ये जवळपास सहा हजार महिला सहभाग घेणार आहे. या कार्यक्रमात मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप देखील सहभागी झाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : युद्धामुळे महिला, मुलांचा परिस्थिती वाईट; शेजारच्या देशांत आश्रय घेण्यास भाग
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल