Rohit Sharma: भारतानं दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर विकेट्स राखून विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 184 धावांचे लक्ष्य भारतानं 17.1 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झालीय.


रोहित शर्माची विक्रमाला गवसणी
- रोहित शर्माने सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या शोएब मलिकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत 124 टी-20 सामने खेळले आहेत.


- या सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून रोहित शर्मानं 50 वा झेल घेतला. भारतासाठी अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला क्षेत्ररक्षक ठरलाय. 


- रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं मायदेशात 16 वा टी-20 सामना जिंकलाय.  कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारे इयॉन मॉर्गन आणि केन विल्यमसनला रोहित शर्मानं मागे टाकलं आहे. त्यांच्या नावावर मायदेशात 15 जिंकल्याची नोंद आहे. 


भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी
-श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा 16 वा टी-20 विजय आहे. विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत पाकिस्तानची बरोबरी केलीय. पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 16 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीतही भारत अव्वल ठरला आहे. 


भारताचा टी-20 मालिकेवर कब्जा
तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतानं सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केलाय. तर, तिसरा टी-20 सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल. धर्माशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिशएन स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे.  


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha