IND Vs SCO: आधी गोलंदाजांनी रोखलं, मग फलंदाजांनी चोपलं; भारताचा स्कॉटलँडवर दणदणीत विजय
IND Vs SCO: भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर देखील अवलंबून राहावे लागणार आहे.
India Vs Scotland: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात आज खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने स्कॉटलँडवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने स्कॉटलँडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच गुडांळले. या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी 6.3 षटकातच संघाला विजय मिळवून दिलाय.
नाणेफेक गमवून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या स्कॉटलँडच्या संघाकडून जॉर्ज मुन्से (19 बॉल 24 धावा), काइल कोएत्झर (7 बॉल 1 धाव), मॅथ्यू क्रॉस (9 बॉल 2 धावा), रिची बेरिंग्टन (5 बॉल 0 धाव), कॅलम मॅकलिओड (28 बॉल 16), मायकेल लीस्क (12 बॉल 21 धावा), ख्रिस ग्रीव्हज (7 बॉल 1 धाव), मार्क वॉट (13 बॉल 14), अलास्डेअर इव्हान्स (1 बॉल 0 धाव), सफियान शरीफ (1 बॉल 0 धाव) आणि ब्रॅडली व्हीलने नाबाद 2 धावा केल्या. ज्यामुळे स्कॉटलँडच्या संघाला 17.4 षटकात केवळ 85 धावा करता आल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामीला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाले. त्यानंतर चक्रवर्तीला 2 दोन तर, आर अश्विनला एक विकेट प्राप्त झालीय.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने (19 बॉल 50), केएल राहुल (16 बॉल 30 धावा) विराट कोहली (2 बॉल 2 धावा, नाबाद) आणि सुर्यकुमार यादवने 2 बॉलमध्ये 6 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने स्कॉटलँडवर 8 विकेट्सने विजय मिळवलाय. स्कॉटलॅंडकडून मार्क व्हॅट आणि ब्रॅड्ली व्हील यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाली आहे.
संबंधित बातम्या-
- Fastest 50s in T20 World Cups: केएल राहुलची विक्रमाला गवसणी, युवराजनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
- T20 WC: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिंचचे मिचेल स्टार्कबद्दल मोठं वक्तव्य
- India tour of South Africa: टीम इंडिया डिसेंबरमध्ये तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक