IND Vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी क्रिडाविश्वाला हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. डोपिंग टेस्टमध्ये (Doping Test) दोषी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजावर (Zubayr Hamza) आयसीसीनं (ICC) मोठी कारवाई केली आहे. या वर्षी 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. त्याचा निकाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आयसीसीनं हमजाला 9 महिन्यांसाठी निलंबित केलंय. 


नेमकं प्रकरण काय?
खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी अनेकदा औषधांचं सेवन करतात. या गोष्टी रोखण्यासाठी जगभरात सर्व प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची नियमितपणे डोपिंग टेस्ट केली जाते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील पार्ल येथील स्पर्धेदरम्यान झुबेर हमजाची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. ज्यात तो दोषी आढळल्यानंतर आयसीसीनं त्याला  9 महिन्यांसाठी निलंबित केलं. हमजावर 22 मार्च 2022 पासून बंदी घालण्यात आलीय. जी 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यासह 17 जानेवारी ते 22 मार्च 2022 पर्यंतची त्यांची वैयक्तिक कामगिरी अवैध ठरवण्यात आलीय. 



हमजाच्या एकदिवसीय कारकिर्दीतून 31 धावा रद्द
हमजाने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत सहा कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 212 धावांची नोंद आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यानं एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे. ज्यात त्यानं 31 धावांची खेळी केली होती. या 31 धावा त्याच्या रेकॉर्डमधून कापल्या जातील.


हमजाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हमजानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्यानं 78 सामन्यांच्या 130 डावांमध्ये 46 च्या सरासरीनं 5 हजार 271 धावा केल्या आहेत. ज्यात 13 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं नाबाद 222 धावांची सर्वात मोठी खेळी खेळलीय.


हे देखील वाचा-