IND vs SA 3rd T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील तिसरा टी-20 सामना इंदोर येथे पार पडला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेनं 49 धावांनी जिंकला. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाहुण्या संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला क्लीन स्वीप देईल, अंस वाटत होते.परंतु, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज रिले रोसोनं (Rilee Rossouw) शतकी खेळी करत भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. भारताविरुद्ध शतक झळकावून रिले रोसोनं खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत त्याचा समावेश झालाय. 


दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत डेव्हिड मिलर अव्वल स्थानी आहे. त्यानं 2017 मध्ये बांग्लादेशविरुद्ध टी-20 सामन्यात अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानंतर रिचर्ज लेवी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूत शतक मारलं. त्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि डेव्हिड मिलर संयुक्तरित्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी 46-46 चेंडूत शतक झळकावली आहेत. फाफनं 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध तर, डेव्हिड मिलरनं भारताविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावलंय. या यादीत रिले रोसोचीही एन्ट्री झालीय. त्यानं भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात 48 चेंडूत शतक ठोकलंय.


ट्वीट-






 



भारतानं 2-1 नं मालिका जिंकली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारतानं 8 विकेट्सनं जिंकला. त्यानंतर गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी पराभवाची धुळ चारली. यासह भारतानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टी-20 मालिकेत पराभूत केलंय. मात्र, अखेरच्या टी-20 सामन्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला क्लीन स्पीप देण्याच्या उद्देशानं मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या पदरात निराशा पडली. या सामन्यात भारताला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. 


हे देखील वाचा-