IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 49 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतानं ही मालिका आपल्या खिशात घातली. दरम्यान,विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत भारतीय संघ तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताकडून दिनेश कार्तिकनं एकाकी झुंज दिली. त्यानं 21 चेंडूत 46 धावांचं योगदान दिलं.


भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे 10 महत्वाचे मुद्दे-


- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना इंदोरच्या होळकर स्टेडियम येथे पार पडला.


- या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.


- दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात झाली असताना क्विंटन डी कॉक आणि रिले रोसोनं संघाचा डाव सावरला.


- क्विंटन डी कॉकनं 43 चेंडूत 68 तर, रिले रोसोनं 48 चेंडूत 100 धावांचं योगदान देऊन दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 227 वर पोहचवली.


- भारताकडून दीपक चाहर आणि उमेश यादवला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


- दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. 


- भारताच्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरनं आपली विकेट्स गमावली. ऋषभ पंतही 14 चेंडूत 27 धावा करून माघारी परतला.


- त्यानंतर दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीनं भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या. परंतु, सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर केशव महाराजनं त्याला क्लीन बोल्ड करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.


- अखेरच्या काही षटकात हर्षल पटेल, दीपक चाहर आणि उमेश यादवनं फटकेबाजी केली. मात्र, तो पर्यंत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकला होता. भारतीय संघ 18.3 षटकात ऑलआऊट झाला.


- दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियस सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी आणि केशव महाराजच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन विकेट्स पडल्या. कागिसो रबाडानंही एक विकेट्स घेतली.



हे देखील वाचा- 


IND vs SA 3rd T20: रिले रोसो, क्विंटन डी कॉकसमोर भारतीय गोलंदाजांचं लोटांगण; विजयासाठी 228 धावांची गरज


T20 World Cup: 2007 पासून 2021 पर्यंत, 'या' फलंदाजांनी टी-20 विश्वचषकात कुटल्यात सर्वाधिक धावा; यादीत दोन भारतीय