IND vs SA : टी20 चा आठवा भारतीय कर्णधार होणार ऋषभ पंत, कोहली वगळता सर्वांनी जिंकला होता पहिला सामना
India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आजापासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आजापासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघासाठी ही यंदाची अखेरची टी 20 मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे. टी 20 मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. ऋषभ पंत भारताचा आठवा टी 20 कर्णधार असेल.. याआधी सात खेळाडूंनी भारताच्या टी 20 संघाचे कर्णधारपद सांभाळलेय.
विराटच्या पहिल्या सामन्यात पराभव -
टी20 मध्ये दक्षिण अफ्रीकाविरोधात 2006 मध्ये वीरेंद्र सेहवागने पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. वीरेंद्र सेहवाग हा पहिला टी 20 चा कर्णधार होय. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सेहवाहनंतर धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांनीही भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळलेय. आतापर्यंत सात खेळाडूंनी भारताच्या टी 20 संघाचे कर्णधारपद सांभाळलेय. यामध्ये विराट कोहलीला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. सेहवाग, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद सांभाळल्यानंतर पहिला सामना जिंकलाय.
धोनीने पाकिस्तानचा केला होता पराभव -
धोनी भारताचा दुसरा टी 20 कर्णधार होय. विश्वचषक 2007 मध्ये धोनीने स्कॉटलँडविरोधात नेतृत्व सांभाळले होते. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर धोनीने पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचं नेतृत्व केले. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सुरेश रैनाने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरोधात 3 टी20 सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. ही मालिका भारताने जिंकली होती. अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्या सामन्यात भारताचा विजय झाला होता.