England vs New Zealand Test Series : न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यात सध्या तीन सामन्यांटी कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. दुसऱ्या सामन्यात तर अगदी दमदार असा विजय इंग्लंडने मिळवला. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने अप्रतिम कामिगिरी केली होती, पण इंग्लंडने जशास तसं उत्तर देत हा सामनाही जिंकला. तीन पैकी दोन सामने जिंकल्याने मालिकेत इंग्लंडने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान हाच आनंद साजरा करताना इंग्लंडचे खेळाडू सध्या तुफान मजा-मस्ती करताना दिसत आहेत. ते थेट भारतीय खाद्यपदार्थ कबाबवर ताव मारत असून या सर्वाचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा VIDEO 



इंग्लंडचा संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) आठव्या स्थानावर आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडचे 2 प्वॉइंट्स कापण्यात आले आहेत. पण यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत (Points Table) इंग्लंडच्या स्थितीत बदल झालेला नाही. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्वॉइंट्स टेबलशिवाय असणाऱ्या परसेंटेज प्वॉइंट्समध्ये (Percentage Points) इंग्लंडला तोटा झाला आहे.   


इंग्लंडच्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये कपात


अप्रतिम खेळ दाखवून इंग्लंडच्या खेळाडूंनी न्यूझीलंडवर विजय मिळवला तरी आयसीसीने (International Cricket Council) स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे खेळाडूंची 40 टक्के मॅच फी कापली आहे. आयसीसीने एक आर्टिकल 16.11.2 बनवलं असून या आर्टीकलनुसार निर्धारीत वेळेत जितके कमी ओव्हर टाकले जाणार तितके WTC प्वॉईट्स कापणार. त्यामुळेच इंग्लंडचे दोन गुण कापण्यात आले असून खेळाडूंनाही 40 टक्के फि कापण्याचा दंड लावण्यात आला आहे.


न्यूझीलंड मालिकेत 2-0 ने मागे


सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून यावेळी तीन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही मालिका सध्या इंग्लंडच्या पारड्यात झुकली आहे. पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. दुसरा सामना तर अत्यंत अटीतटीचा झाला दोन्ही संघानी दमदार खेळीचं प्रदर्शन घडवलं. पण अखेर सामना इंग्लंडनेच 5 विकेट्सने जिंकला. या मालिकेत जो रुट तुफान फॉर्ममध्ये दिसून येत आहे. त्याने दोन सामन्यातील चार डावात 305 रन केले असून यावेळी त्याची सरासरी देखील तब्बल 101.67 इतकी आहे. दरम्यान आता तिसरा सामना 23 जूनपासून हेंडिग्ले, लीड्स याठिकाणी खेळवला जाणार आहे.


हे देखील वाचा-