IND vs SA LIVE Score: टीम इंडियाची दमदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांत गुंडाळला, जाडेजाचे पाच बळी
World Cup 2023: टीम इंडियानं क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलग सात सामने जिंकले. आता भारतीय क्रिकेट संघ आपला पुढचा सामना आज (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघा 83 धावांत गुंडाळले.
76 धावांत आफ्रिकेला सातवा धक्का बसलाय.
जाडेजाने डेविड मिलरला गेले बाद... आफ्रिकेला सहावा धक्का
आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतलाय.... शामीने दिला दुसरा धक्का... दुसेन फक्त 11 धावांवर बाद.. आफ्रिका पाच बाद 40 धावा
जड्डूने आफ्रिकेला दिला आणखी एक धक्का.. क्लासेन तंबूत परतला.. आफ्रिका चार बाद 40 धावा
दक्षिण आफ्रिकेलीच बलाढ्य फलंजाजी भारताच्या गोलंदाजीसमोर ढेपाळली. आफ्रिकेने 10 षटकानंतर तीन विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 35 धावा केल्या आहेत.
मोहम्मद शामीने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिलाय. मारक्रम याला फक्त 9 धावांवर तंबूत धाडले. 35 धावांत आफ्रिकेला तिसरा धक्का बसलाय
जाडेजाने दिला आफ्रिकेला दुसरा धक्का... बावुमाला पाठवले तंबूत..
मोहम्मद सिराजने डिकॉकला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.
सूर्या बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने वादळी फलंदाजी करत फिनिशिंग टच दिला. जाडेजाने 15 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावांचे महत्वाचे योगदान दिले.
भारताची 326 धावांपर्यंत मजल... आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचे आव्हान
विराट कोहलीचे 49 वे वनडे शतक.. सचिनच्या शतकांची बरोबरी
विराट कोहली 99 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाने 300 धावांचा पल्ला पार केला आहे. आणखी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
सूर्याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बलाय.
केएल राहुल मोक्याच्या क्षणी बाद झालाय. भारताला चौथा धक्का बसला. हाणामारीच्या षटकात केएल राहुल याला मोठी खेळी करता आली नाही. राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. केएल राहुल याने 17 चेंडूत फक्त 8 धावा काढता आल्या.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर अय्यर मैदानावर आला. पण सुरुवातीला आफ्रिकन माऱ्यापुढे अय्यर चाचपडला. 30 धावा काढल्यानंतर अय्यरने फक्त दहा धावा केल्या होत्या. पण जम बसल्यानंतर अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने 87 चेंडूत 77 धावांची झंझावती खेळी केली. अय्यरने विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. अय्यरने आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले. अय्यर आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 158 चेंडूत 134 धावांची भागीदारी झाली.यामध्ये विराट कोहलीचा वाटा 49 तर अय्यरचा वाटा 77 इतका होता.
जम बसल्यानंतर श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा विकेट फेकली. 77 धावांवर अय्यर बाद झालाय
विराट आणि अय्यरकडून वादळी फलंदाजी सुरु आहे. भारताचे द्विशतक फलकावर लागलेय
विराट कोहली याच्यानंतर श्रेयस अय्यरनेही अर्धशतक ठोकले. अय्यरने आफ्रिकेच्या गोलंदाजाची धुलाई केली.
वाढदिवसाला विराट कोहलीचा अर्धशतकी तडाखा....
विराट-अय्यरची अर्धशतकी भागीदारी झाली आहे. गिल आणि रोहित बाद झाल्यानंतर डाव सावरला.
मागील 12 षटकांपासून विराट आणि अय्यर यांना एकही चौकार मारता आला नाही.
सचिन तेंडुलकरनंतर आयसीसी वर्ल्डकपमध्ये 1500 धावा करणारा विराट कोहली दुसराच खेळाडू
13.2 षटकात भारताचे शतक फलकावर लागलेय. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आहेत...
शुभमन गिलच्या रुपाने भारताला मोठा धक्का बसलाय. 93 धावांवर भाराताला दुसरा धक्का बसलाय. शुभमन गिल 23 धावांवर बाद झालाय. केशव महाराजने गिलला पाठवले तंबूत
रोहित शर्माने झटपट धावा करत आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा केल्या. आता विराट आणि गिल मैदानावर आहेत.
रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.. रोहित शर्मा 42 धावांवर बाद झाला
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात एक बदल करण्यात आलाय. आफ्रिकेने ईडन गार्डन मैदानावर तरबेज शम्सीला स्थान देण्यात आलेय. रोहित शर्माने संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवलाय.
इडन गार्डन्स मैदानावर रोहित शर्माने नाणेफेक जिंकली
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर थोड्याच वेळात होणार नाणेफेक
पार्श्वभूमी
IND vs SA LIVE Score, World Cup 2023: टीम इंडियानं (Team India) क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup) मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलग सात सामने जिंकले. आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपला पुढचा सामना आज (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत अव्वल दोन संघांमधील हा सामना 'फायनलपूर्वीचा अंतिम सामना' मानला जात आहे.
आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा 'बर्थडे बॉय' विराट कोहलीवर असतील. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मात्र, आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियानं आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच, वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे.
टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल?
ईडन गार्डन्सचा पिच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरतो, पण नंतर या पिचची स्पिनर्सलाही मदत होते. अशा परिस्थितीत टीम इंडिया या सामन्यात अतिरिक्त स्पिनर फिरकी गोलंदाज (रविचंद्रन अश्विन) खेळवतो की नाही हे पाहणे बाकी आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ सुरुवातीचे सामने खेळता आले. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने मैदानात उतरलेल्या प्लेईंग-11 ने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न झाल्यास नवल वाटणार नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियानं आजवर स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. कोहली (442 धावा) आणि रोहित (402 धावा) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही धमाकेदार खेळी करत . या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावा करत प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. श्रेयस अय्यरनंही 82 धावा करून टीम इंडियाच्या फलंदाजांची जादू दाखवून दिली.
डिकॉकला लवकर माघारी धाडणं गरजेचं
दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर, शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (545 धावा) फॉर्म गोलंदाजांसाठी फार वाईट ठरतो. डीकॉकला रोखणं भल्या भल्या गोलंदाजांसाठी अवघड होतं. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 5 वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एडन मार्कराम (7 डावांत 362 धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (7 डावांत 353 धावा) आणि हेनरिक क्लासेन (315 धावा) यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. तसेच, साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजीत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. मार्को जॅनसेननं आतापर्यंत 7 सामन्यात सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिकेचा H2H रेकॉर्ड
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेईंग-11
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -