IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतनं (Rishabh Pant) एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) दुखापतीनंतर ऋषभ पंतकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरलाय. सर्वात कमी वयात भारताचा कर्णधार बनण्याचा विक्रम माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाच्या (Suresh Raina) नावावर आहे. सुरेश रैनानं वयाच्या 23 वर्षे 197 दिवसांत भारताचं नेतृत्व केलं होतं.
ऋषभ पंतची नव्या विक्रमाला गवसणी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं. त्यावेळी त्याचं वय 24 वर्षे 248 दिवस इतकं होतं. ज्यामुळं सुरेश रैनानंतर तो दुसरा सर्वात युवा कर्णधार ठरलाय, ज्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. जेव्हा महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला, तेव्हा त्याचं वय 26 वर्षे 66 दिवस इतकं होतं. याशिवाय, ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असणारा चौथा विकेटकीपर ठरलाय. यापूर्वी सय्यद किरमाणी, राहुल द्विद आणि महेंद्रसिंह धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलंय.
भारताचे सर्वात युवा टी-20 संघाचा कर्णधार-
क्रमांक | खेळाडूचं नाव | वर्ष |
1 | सुरेश रैना | 23 वर्ष 197 दिवस |
2 | ऋषभ पंत | 24 वर्ष 248 दिवस |
3 | महेंद्रसिंह धोनी | 26 वर्ष 68 दिवस |
4 | अजिंक्य रहाणे | 27 वर्ष 41 दिवस |
5 | वीरेंद्र सेहवाग | 28 वर्ष 42 दिवस |
दिनेश कार्तिकची तीन वर्षानंतर भारतीय संघात एन्ट्री
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करत दिनेश कार्तिकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेत त्याला संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, तब्बल तीन वर्षानंतर त्यानं भारतीय संघात जागा मिळवली आहे. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पांड्याचंही भारतीय संघात पुनरागमन झालंय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय.
हे देखील वाचा-