Aiden Markram Ruled Out: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलंय. या मालिकेत भारत 2-1 नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील दोन सामने शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका बसलाय. या मालिकेतील चौथा सामना 17 जून रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
एडन मार्करामला कोरोनाचा संसर्ग
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत एडन मार्करामला एकही सामना न खेळता मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकानं बुधवारी ट्विट करून ही माहिती दिलीय. सीएसएनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, " एडन मार्करामची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय. प्रोटो कॉलनुसार, त्याला पुढील सात दिवस क्वारंटाईन राहवं लागणार आहे.
क्विंटन डी कॉकच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती
यासोबतच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही क्विंटन डी कॉकच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या मनगटाच्या दुखापतीत चांगली सुधारणा झालीय . मेडिकल टीम त्याच्या बरे होण्यावर सतत लक्ष ठेवून आहे. चौथ्या टी-20 सामन्यात त्याच्या उपलब्धतेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही म्हटलं गेलं आहे.
भारत 2-1 नं पिछाडीवर
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतानं तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. मालिका जिंकण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. यामुळं पुढील दोन्ही सामने भारतासाठी 'करो या मरो' असणार आहेत.
हे देखील वाचा-