IND vs SA, 5th T20I Live Updates : पावसामुळे पाचवा सामना रद्द, मालिका बरोबरीत
IND vs SA, 5th T20I Live Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली.
पावासामुळे सामना रद्द, मालिका बरोबरीत
2.3 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. 10.20 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणार आहे. पाच-पाच षटकांचा सामना होणार आहे.
सामन्यात पावासाचा अडथळा
3.3 षटकानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आलाय.
भारताला लागोपाठ दुसरा धक्का, ईशान किशननंतर गायकवाडही परतला आहे. लुंडी एनगिडीनेच घेतली दुसरी विकेट... ऋतुराज गायकवाड 10 धावा काढून बाद
विस्फोटक फलंदाज ईशान किशन बाद... लुंडी एनगिडीने ईशान किशनला 15 धावांवर बाद केले. भारताला पहिला धक्का
पाऊस थांबला, थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 19 षटकांचा खेळवण्यात येणार आहे. सात वाजून 50 मिनिटांनी पहिला चेंडू फेकण्यात येणार आहे.
नाणेफेक झाल्यानंतर बेंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडिअमवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावा लागला.
क्विंटन डिकॉक (विकेटकिपर), रिजा हेंड्रिक्स, डेवान प्रिटोरियस, रासी वान डुसेन, एच. कालसेन, डेविड मिलर, ट्रस्टिन स्टब्स, कगिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), एनरिक नॉर्त्जे, लुंगी एनगिडी
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल
दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रीजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिलेय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
टेम्बा बावुमाच्या अनुपस्थितीत केशव महाराज करणार दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा पाचव्या टी 20 मधून बाहेर गेलाय. चौथ्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो पाचव्या सामन्याला मुकणार आहे.
IND vs SA, 5th T20I Live Updates : मागील 11 करो या मरो अथवा निर्णायक सामन्यात भाराताला तब्बल 9 वेळा विजय मिळालाय. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जातेय. सुरुवातीचे दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतरही भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या मालिकेतील आज अखेरचा सामना होणार आहे. 2016 पासून भारतीय संघाने 11 निर्णायक अथवा करो या मरो सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला 9 वेळा विजय मिळलाय. त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय न आल्यास भारतीय संघ बाजी मारेल, असे क्रीडा तज्ज्ञांचं मत आहे. दुसरीकडे कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. निर्णायक सामन्यात केशव महाराज अथवा डेविड मिलर याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकते.
पार्श्वभूमी
IND vs SA, 5th T20I Live Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली.राजकोट जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेरच्या टी20 सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओही पोस्ट केलाय. निर्णायक सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरली. आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका कधीच जिंकले नाही. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा भारताचा दौरा केला आहे. यामध्ये भारताचा पराभव झालाय. आजचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला.
ऋषभ पंतकडं इतिहास रचण्याची संधी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -