गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान

पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Continues below advertisement

Pandharpur vithhal mandir silver door

Continues below advertisement
1/7
पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
2/7
लाडक्या विठ्ठलासाठी आपल्यापरीने दानपेटीत दानही टाकतात. मंदिर प्रशसनाकडे देणगी स्वरुपातही रक्कम दिली जाते. अनेकदा दानपेटीला मौल्यवान वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते.
3/7
पंढरी नगरीत सध्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.
4/7
दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. त्यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे.
5/7
शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व.जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे.
Continues below advertisement
6/7
अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. त्यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.
7/7
image 7
Sponsored Links by Taboola