एक्स्प्लोर

IND vs SA 5th T20: मागील 11 करो या मरो सामन्यात भारताची 9 वेळा बाजी, आज काय होणार?

India vs South Africa 5th T20 Bengaluru : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज निर्णायक सामना होणार आहे. करो या मरो सामन्यात दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे.

India vs South Africa 5th T20 Bengaluru : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज निर्णायक सामना होणार आहे. करो या मरो सामन्यात दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नस्वॉमी स्टेडिअमवर दोन्ही संघ मैदानात भिडणार आहे. सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत आहे, तरीही कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबतच एक महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. मागील 11 करो या मरो अथवा निर्णायक सामन्यात भाराताला तब्बल 9 वेळा विजय मिळालाय. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जातेय. सुरुवातीचे दोन सामन्यात पराभव मिळाल्यानंतरही भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या मालिकेतील आज अखेरचा सामना होणार आहे.

 2016 पासून भारतीय संघाने 11 निर्णायक अथवा करो या मरो सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला 9 वेळा विजय मिळलाय. त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय न आल्यास भारतीय संघ बाजी मारेल, असे क्रीडा तज्ज्ञांचं मत आहे. दुसरीकडे कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. निर्णायक सामन्यात केशव महाराज अथवा डेविड मिलर याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकते.  

दरम्यान, राजकोट जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेरच्या टी20 सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओही पोस्ट केलाय. निर्णायक सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरली.  आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका कधीच जिंकले नाही. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा भारताचा दौरा केला आहे. यामध्ये भारताचा पराभव झालाय. आजचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला. 

ऋषभ  पंतकडं इतिहास रचण्याची संधी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
AUS vs BAN 1st Test : आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?
आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget