India vs South africa Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने तिसर सामना जिंकत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. पण अजूनही दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताने विजय मिळवला तरच त्यांना बरोबरी साधता येणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते मालिका जिंकणार आहेत. आजच्या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ सर्व शक्य प्रयत्न करतील. दरम्यान आज पार पडणाऱ्या सामन्यांत अंतिम 11 मध्ये शक्यतो भारत कोणताही बदल करणार नाही. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


आज 17 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि दक्षिण आफ्रिका हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी 10 सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त दोनच सामने गमावले आहेत. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.  आता देखील मालिकेतील दोन सामने आफ्रिकेने जिंकत 2-1 ने वर्चस्व घेतलं आहे.



हे देखील वाचा-