West Indies vs Ireland: पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात आयर्लंडनं (Ireland)दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) ला पाच विकेट्सनं पराभूत केलं. या विजयासह आयर्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला धावांचं लक्ष्य बदलून देण्यात आलं. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी सामना 5 विकेट्सनं जिंकला. आता दोन्ही संघामध्ये तिसरा आणि शेवटचा सामना 16 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
वेस्ट इंडिजनं पहिला सामना 24 धावांनी जिंकला होता. या सामन्यात देखील वेस्ट इंडिजला चांगलीच मेहनत करावी लागली होती. दुसऱ्या सामन्यातही संघाची स्थिती तशीच दिसून आली. वेस्ट इंडिजचा संघ संपूर्ण 50 षटकं फलंदाजी करु शकला नाही. वेस्ट इंडिज संघानं 48 षटकांमध्ये 229 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळं वेस्ट इंडिजचा संघ 200 चा आकडा पार करु शकला.
आठव्या क्रमांकावर आलेल्या रोमारियो शेफर्डनं 41 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. त्याला ओडियन स्मिथनं चांगली साथ दिली. त्यानं केवळ 19 चेंडूमध्ये धडाकेबाज 46 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळं वेस्ट इंडिजचा संघ 229 धावांपर्यंत पोहोचू शकला. आयर्लंडकडून मॅक्ब्राइननं 10 षटकात 36 धावा देत 4 विकेट घेतल्या तर क्रेग यंगनं 8 षटकात 42 धावा देत 3 विकेट आणि जोश लिटिलनं 2 विकेट घेतल्या.
230 धावांचं लक्ष्य घेऊन आयर्लंडचा संघ ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी पावसानं हजेरी लावली. पावसानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघाला 36 षटकात 168 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. हे लक्ष्य आयर्लंडनं 4 विकेट्स गमावत 33 षटकात पार केलं. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरनं 54 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Ind vs SA, 3rd Test, 3rd Day Highlights: दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत, विजयासाठी केवळ 111 धावांची गरज, भारताला मात्र 8 विकेट्स घेणं अनिवार्य
- Ind vs SA, 3rd Test, 3rd Day Highlights: आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांची गरज, भारताची गोलंदाजी सुरु
- IND vs SA 3rd Test: ऋषभ पंत पुन्हा चमकला, परदेशी भूमीत आणखी एक शतक, एकहाती झुंज देत भारताचा डावही सावरला