Ind vs SA, 1 Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या रंगतदार स्थितीत आहे. भारताने आज दिवसभरात दक्षिण आफ्रिकेचे 9 गडी बाद करत आपला दुसरा डावही सुरु केला आहे. सध्या केएल राहुल आणि मयांक बाद झाल्यानंतर कोहली आणि पुजारा क्रिजवर आहेत. भारताने दिवसअखेर 57 धावा केल्या असून 70 धावांची आघाडी घेतली आहे.
भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपल्यानंतर भारताने आफ्रिकेला 210 धावांत सर्वबाद करत 13 धावांची आघाडी घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यानंतर भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले आहेत. त्यामुळे सध्या कोहली आणि पुजारा क्रिजवर आहेत.
भारताचा पहिला डाव
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.
जसप्रीतचा 'पंच' आफ्रिका सर्वबाद
सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली आहे. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. ज्यामुळे आफ्रिका 210 धावाच करु शकले आहेत.
हे देखील वाचा
- Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोख 'शतक', अशा कामगिरी करणारा सहावा भारतीय
- IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha