Ind vs SA, 1 Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असून नुकताच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव आटोपला आहे. भारताने आफ्रिकेला 210 धावांत सर्वबाद करत 13 धावांची आघाडी कायम ठेवली आहे. सध्या भारतीय फलंदाज फलंदाजी करत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत.


दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताना भारताने एक विकेट मिळवली होती 17 धावांवर आफ्रिकेने खेळाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली आहे. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या आहेत. 



आतापर्यंत सामन्यात


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला. त्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असून 5 विकेट घेतले. इतरही गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत आफ्रिकेला 210 धावांच रोखलं असून 13 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे.


हे देखील वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha