Ind vs SA, 1 Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. भारताने पहिल्या डावात कर्णधार कोहलीच्या 79 आणि पुजाराच्या 47 धावांच्या जोरावर 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी सुरु केली असता भारताच्या जसप्रीत बुमराहने आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला तंबूत धाडलं आहे. दिवस संपताना आफ्रिकेची स्थिती 17 धावांवर एक बाद अशी आहे.



आफ्रिकेच्या केपटाउन येथे सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला. त्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने पहिला गडी बाद करत भारताला पहिलं आणि मोठं यशही मिळवून दिलं आहे. आता दुसऱ्या दिवशी भारताला पटापट आफ्रिकेचे फलंदाज बाद करुन दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या निर्माण करावी लागणार आहे.


मालिका रंगतदार स्थितीत


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही


 हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha