Rohit Sharma Nose Bleeding : कोणत्याही संघाचा कर्णधार याचं काम केवळ सूचना देणं नसून कोणत्याही परिस्थिती संघासाठी उभ राहणं हे असतं. याचीच प्रचिती टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी20 (IND vs SA) सामन्यात आला. भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहितच्या नाकातून चक्क रक्त येत असतानाही त्याने मैदान न सोडता खेळाडूंना इन्स्ट्रक्शन्स देणं सुरु ठेवलं. त्याच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत आहे. 

 

रविवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) दुसरा टी20 सामना 16 धावांनी जिंकत मालिकाही 2-0 ची विजयी आघाडी घेत खिशात घातली आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली. रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही. या तुफान कारकिर्दीमागे त्याचं डेडिकेशन दिसून येतं. त्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कृतीतून हेच दिसून आलं. 

 

पाहा VIDEO









 

रोहितनं गाठला 400 टी20 सामन्यांचा टप्पा

 

कर्णधार रोहित शर्मा 400 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासह लीग सामन्यांचाही समावेश आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 191, भारतासाठी 141, डेक्कन चार्जर्स 47 सामने खेळले आहेत. त्याशिवाय मुंबईसाठी 17 आणि इंडियंस आणि इंडिया-एसाठी दोन दोन सामने खेळले आहेत.  

हे देखील वाचा -