IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर अवघ्या 215 धावांमध्ये त्यांचा संघ सर्वबाद झाला आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी कमाल गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतले. इतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळे केवळ 216 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारत सामना आणि मालिका नावावर करु शकतो.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत एक मोठं लक्ष्य उभारलं होतं. तसंच ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने हा निर्णय श्रीलंका संघाने घेतला असावा. पण भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा हा निर्णय चूकीचा ठरला. ज्यामुळे अवघ्या 215 धावांवर श्रीलंका संघ सर्वबाद झाला. केवळ पदार्पण करणाऱ्या एन. फर्नांडो याने अर्धशतक झळकावल्यामुळे श्रीलंकेचा संघ 200 पार धावसंख्या नेऊ शकला. याशिवाय कुसल मेंडीसनेही 34 धावांची झुंज दिली. इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत.


कुलदीप-सिराजची कमाल


भारतीय गोलंदाजांनी आज फारच कमाल गोलंदाजी केली. ज्यामुळे 39.4 षटकांतच श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने अवघ्या 5.3 षटकांत 30 धावा देत 3 विकेट्स घेत सर्वात भारी गोलंदाजी केली. याशिवाय उमरान मलिकेने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. एक श्रीलंकेचा गडी धावचितही झाला. ज्यामुळे 215 वर श्रीलंका ऑलआऊट झाली असून आता भारत फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे.


हे देखील वाचा-