Sachin Tendulkar vs Virat Kohli :  विराट कोहली (Virat Kohli) गेल्या तीन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) फ्लॉप होत असला तरी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो आपल्या जुन्या लयीत आता परतला आहे. तो टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) बॅक टू बॅक दमदार इनिंग खेळत आहे. नुकतेच टी-20 मध्ये (T20 Century) शतक झळकावल्यानंतर त्याने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकं झळकावली (ODI Century) आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्याची तुलना महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) केली जात आहे.


सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने वनडेमध्ये आतापर्यंत 45 शतकं झळकावली आहेत. अशा स्थितीत तो सचिनच्या या मोठ्या विक्रमापासून आता फार दूर नाही. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत तो सचिनपेक्षा 5 हजार धावांनी मागे आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सरासरीमध्ये तो सचिनपेक्षा खूप पुढे आहे. वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर पाहिले तर या दोन खेळाडूंमध्ये फारसा फरक नाही. अशा परिस्थितीत जेव्हा सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) या दोघांच्या तुलनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या माजी क्रिकेटपटूनं उत्तर देतच प्रश्न फेटाळून लावला.


काय म्हणाला गांगुली?


पीटीआयशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. कोहली हा अप्रतिम खेळाडू आहे. अशा अनेक खेळी त्याने खेळल्या आहेत. 45 शतके अशीच बनत नाहीत. तो खास खेळाडू आहे. एक टप्पा होता जेव्हा तो गोल करत नव्हता पण तो खरोखर चांगला खेळाडू आहे.


कोहली कसोटीत सचिनच्या आसपासही नाही


विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar in Test) आकडेवारीला आव्हान दिले आहे परंतु तो कसोटीत मास्टर ब्लास्टरच्या जवळपासही नाही. सचिन तेंडुलकरने कसोटीत 51 शतके ठोकली असून त्याच्या नावावर 15921 धावा आहेत. येथे विराट कोहलीच्या नावावर केवळ 27 शतकं आणि 8119 धावा आहेत. त्याची कसोटीतील फलंदाजीची सरासरीही सचिनपेक्षा खूपच कमी आहे.


हे देखील वाचा-