Ind vs SA, 1st Test, 4th Day Highlights : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सेंच्युरियन मैदानात (Centurion) सुरु असलेला पहिल्या कसोटी सामना रंगतदार स्थितीत आला आहे. भारतीय संघ एका चांगल्या स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला असून भारताला विजयासाठी 211 धावांच आव्हान रोखताना 6 विकेट घ्यायचे आहेत. पण दक्षिण आफ्रिकेलाही 211 धावांचीच गरज असून त्यांचा कर्णधार एल्गर अर्धशतक पूर्ण करुन खेळत असल्याने तोही चांगल्या लयीत दिसून येत आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी चुरशीची लढाई दिसून येईल हे नक्की!




आतापर्यंत सामना


सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. 197 धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर 130 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केएल राहुलने सुरुवातीला टिकून खेळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने विकेट जात असल्याने राहुलही 23 धावा करुन बाद झाल. मग पुजारा आणि कोहली खेळ सांभाळत आहेत, असे वाटत होते. पण तेव्हाच आधी पुजारा 16 आणि मग कोहली 18 धावा करुन तंबूत परतले. रहाणेही 20 धावाच करु शकला. ज्यानंतर ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात 34 धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता होती.


त्यानंतर दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव खेळत असताना भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आफ्रिकेचे सुरुवातीचे फलंदाज भारताने तंबूत धाडले. पण सलामीवीर आणि कर्णधार डीन एल्गर हा टिकून खेळत असल्याने दिवस अखेर तो नाबाद 52 धावांवर आहे. त्यामुळे आफ्रिकेला कर्णधाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अखेरच्या दिवशी त्यांना 211 धावा करायच्या असून भारताला 6 विकेट घेऊन आफ्रिकेला सर्वबाद करायचं आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha