South Africa Tour : भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, लवकरच सामन्यांना सुरुवात
भारतीय क्रिकेट संघ आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून लवकरत कसोटी सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी अनुभवी पुजाराला संधी मिळेल का? हे पाहावे लागेल. (Photo : @BCCI Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुमार कामगिरीमुळे उपकर्णधारपद गमावलेल्या अजिंक्य रहाणे आतातरी चांगली कामगिरी करेल का? याकडे अनेकांचे लक्ष आहे. (Photo : @BCCI Twitter)
संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकाची प्रतिक्षा या दौऱ्यात संपावी अशी आशा विराट फॅन्ससह सर्व भारत करत आहे. (Photo : @BCCI Twitter)
इशांत शर्मा या दौऱ्यात दुखापतींशिवाय सर्व सामने उत्तरित्या खेळेल अशी आशा असून गोलंदाजीची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. (Photo : @BCCI Twitter)
रोहित शर्मा दुखापग्रस्त झाल्याने केएल राहुलला नुकतंच कसोटी संघाचं उपकर्णधारपद मिळालं आहे. (Photo : @BCCI Twitter)
संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चमकदार कामगिरी कऱण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo : @BCCI Twitter)
गोलंदाजीची जबाबदारी उमेश यादववर ही असणार आहे. (Photo : @BCCI Twitter)
मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार कामगिरीनंतर श्रेयसकडून सर्वांना अनेक अपेक्षा आहेत. (Photo : @BCCI Twitter)
युवा गोलंदाज मोहम्मद सिराज कसीटी फॉर्मेटमध्ये भारताचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. (Photo : @BCCI Twitter)
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघासह दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. (Photo : @BCCI Twitter)
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मागील काही दिवस लक्षणीय खेळी न केल्यामुळे त्याच्याकडेही अनेकांचे लक्ष आहे. (Photo : @BCCI Twitter)