South Africa tour of India 2022: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक चाहरच्या (Deepak Chahar) भेदक माऱ्यापुढं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातलंय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेडून केशव महाराजनं (Keshav Maharaj) एकाकी झुंज दिली. त्यानं दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक 35 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामना जिंकण्यासाठी भारताला 20 षटकात 107 धावांची गरज आहे.
ट्वीट-
या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय. दरम्यान, दीपक चाहर आणि अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ डगमगताना दिसला. अवघ्या 15 चेंडूत आणि 9 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिल्या चषकातील अखेरच्या चेंडूवर दीपक चाहरनं कर्णधार टेम्बा बावुमाला (1 धाव) माघारी धाडलं. त्यानंतर अर्शदीप सिंहनं आपल्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक (4 चेंडू 1 धाव), रीली रॉसी (0 धाव), डेव्हिड मिलर (0 धाव) आऊट केलं. त्यानंतर दिपक चहरनं तिसऱ्याच षटकात ट्रिस्टन स्टब्सला (0 धाव) बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या डोळ्यात पाणी आणलं. त्यानंतर एडन मार्कराम आणि केशव महाराजनं संघाचा डाव पुढं नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आठव्या षटकात हर्षल पटेलनं मार्करामच्या रुपात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहावा धक्का दिला. त्यांनंतर 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलनं केशव महाराजला माघारी धाडलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून भारतासमोर 20 षटकात 107 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून अर्शदीप सिंहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दीपक चाहर आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, अक्षर पटेलनं एक विकेट्स घेतली.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.
हे देखील वाचा-