ACC Emerging Men’s Asia Cup 2023 : इमर्जिंग एशिया कप 2023 मध्ये भारत ए संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताने युएई आणि नेपाळ या संघाचा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. बुधवारी भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत (India and Pakistan) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ ब गटात आहेत. हे दोन्ही संघ ब गटात आघाडीवर आहेत. भारत ए आणि पाकिस्तान ए संघाने आधीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केलाय. ब गटामधील भारत आणि पाकिस्तान यांचा अखेरचा साखळी सामना बुधवारी होणार आहे. या सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरार-
इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने निर्वादित वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत दोन्ही सामन्यात बाजी मारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. साई सुदर्शन, यश धुळ आणि अभिषेक शर्मा यांनी फलंदाजी मोठे योगदान दिलेय. हर्षित राणा आणि राजवर्धन हंगरकेकर, निशांत सिंधू आणि मानव सुतार यांनी भेदक मारा केला. युएई आणि नेपाळ दोन्ही संघांना भारतीय गोलंदाजांनी ऑलआऊट केले होते. पाकिस्तान विरोधात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
पाकिस्ताननेही स्पर्धेत दमदार कामगिरी करत वर्चस्व मिळावलेय. मोहम्मद वासिम आणि शहनवाज धानी यांनी मोठे योगदान दिलेय. कासिम अक्रम या 20 वर्षीय खेळाडूनेही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. कासिम अक्रम याच्या गोलंदाजीचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल. त्याशिवाय एस फरहान Sahibzada Farhan आणि कामरान गुलाम यांनीही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय.
कुठे आणि कधी होणार सामना ?
भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील इमर्जिंग एशिया कपमधील सामना श्रीलंका येथील कोलंबोच्या (R. Premadasa Stadium, Colombo) मैदानात होणार आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणता संघ बाजी मारणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
कुठे पाहता येणार सामना ?
इमर्जिंग एशिया कप 2023 मध्ये होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बुधवारी दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. हा सामना फॅनकोड अॅप आणि संकेतस्थळावर पाहाता येणार आहे. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच्या चॅनलवरही (Star Sports Network) हा सामना चाहत्यांना पाहता येईल.
IND vs PAK: Squads
India A: Sai Sudharsan, Abhishek Sharma (vc), Nikin Jose, Pradosh Ranjan Paul, Yash Dhull (c), Riyan Parag, Nishant Sindhu, Prabhsimran Singh (wk), Dhruv Jurel (wk), Manav Suthar, Yuvrajsinh Dodiya, Harshit Rana, Akash Singh, Nitish Kumar Reddy, Rajvardhan Hangargekar, Harsh Dubey, Nehal Wadhera, Snell Patel, Mohit Redkar
Pakistan A: Mohammad Haris (c & wk), Omair Bin Yousuf (vc), Amad Butt, Arshad Iqbal, Haseebullah, Kamran Ghulam, Mehran Mumtaz, Mubasir Khan, Mohammad Wasim Jnr, Qasim Akram, Sahibzada Farhan, Saim Ayub, Shahnawaz Dahani, Sufiyan Muqeem and Tayyab Tahir