एक्स्प्लोर

रोहित-विराटकडे मोठ्या विक्रमाची संधी, पाकिस्तानविरोधात डाव साधणार का?

Virat Kohli - Rohit Sharma : टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांकडे मोठ्या विक्रमाची संधी आहे. पाकिस्तानविरोधात रोहित शर्मा आणि विराट कोहली ती संधी साधणार का?

Virat Kohli - Rohit Sharma : टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांकडे मोठ्या विक्रमाची संधी आहे. पाकिस्तानविरोधात रोहित शर्मा आणि विराट कोहली ती संधी साधणार का? रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. पाकिस्तानविरोधात झालेल्या साखळी सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीला मोठी खेळी करता आली नव्हती. शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यापुढे या दोघांच्या दांड्या गुल झाल्या होत्या. आता रविवारी या दोघांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पाकिस्तानविरोधात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा विक्रम करण्याची संधी असेल. रोहित शर्मा वनडेत दहा  हजार धावा तर विराट कोहली 13 हजार धावा पूर्ण करु शकतो. पाहूयात, त्याबाबत सविस्तर माहिती

रोहित दहा हजार धावसंख्येच्या जवळ -

भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून 78 धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 239 डावात 9922 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या आधी 14 खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये सध्या खेळत असलेला विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या, विराट कोहली, जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, ख्रिस गेल, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान यांनी आतापर्यंत 10 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

विराट 13 हजार धावांचा टप्पा पार करणार

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 98 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर याने 321 वनडे डावात 13 हजार धावांचा पल्ला पार केला. सचिन तेंडुलकरचा 13 हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी 321 डाव लागले होते, विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 21 डाव असतील. विराट कोहलीने 266 डावांमध्ये 12902 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आशिया चषकात वेगवान 13 हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. 98 धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम विराट कोहली मोडणार आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या यांनी वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

रोहित-विराट जोडीही करणार विक्रम - 

विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये आतापर्यंत 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget