India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकात टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना पक्का! पण त्यासाठी जुळून यावी लागतील 'ही' समिकरणं
India vs Pakistan: आशिया चषकात टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना पक्का, पण त्यासाठी काही समिकरणं जुळून यावी लागतील, जाणून घेऊयात सविस्तर...
![India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकात टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना पक्का! पण त्यासाठी जुळून यावी लागतील 'ही' समिकरणं Ind vs pak 3rd match in asia cup 2023 final scenario India vs pakistan final asia cup super 4 points table update Know details India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकात टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना पक्का! पण त्यासाठी जुळून यावी लागतील 'ही' समिकरणं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/370d54975ea0aa37ce778338446f681f1694354615710625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मधील सुपर-4 चा थरार आता आणखी रंगतदार झाला आहे. या स्पर्धेत टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण सुपर-4 मध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा टीम इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. या सामन्या टीम इंडियानं पाकिस्तानचा पुरता धुव्वा उडवला. पाकिस्तानला 228 धावांच्या मोठ्या फरकानं टीम इंडियानं पराभूत केलं. वनडे इतिहासात पाकिस्तानच्या विरोधात धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो. या धमाकेदार सामन्यामुळे सुपर-4 च्या पॉईंट टेबलमध्ये उत्कंठा वाढली आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.
आज श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून भारत अंतिम फेरीत पोहोचणार
क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या आशिया चषकात टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. जर समिकरणं जुळून आली, तर क्रिकेट चाहत्यांना आशिया चषकाच्या फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना पुन्हा एकदा अनुभवायला मिळू शकतो. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये हा सामना होऊ शकतो. दरम्यान, यंदाच्या आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाला आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करेल. असं झाल्यास सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. दोन्ही सामन्यांचा निकाल सारखाच लागला, तर अंतिम फेरीत टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.
सुपर-4 च्या सामन्यांचं टाईमटेबल
टीम इंडिया : 1 सामना - 2 पॉईंट्स, 4.560 नेट रनरेट
श्रीलंका : 1 सामना - 2 पॉईंट्स, 0.420 नेट रनरेट
पाकिस्तान : 2 सामने - 2 पॉईंट्स, -1.892 नेट रनरेट
बांग्लादेश : 2 सामने - 0 पॉईंट्स, -0.749 नेट रनरेट
Largest margin of victory for 🇮🇳 against Pakistan in men's ODIs ✅
— ICC (@ICC) September 11, 2023
A terrific result for India 👏#AsiaCup2023 | #PAKvIND | https://t.co/lVQWhUIzlk pic.twitter.com/V7XGWldfyt
टीम इंडियाला आता आणखी 2 सामने खेळायचेत
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला सुपर-4 फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील संघाचा दुसरा सामना आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यानंतर तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध (15 सप्टेंबर) होईल. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ फायनलला कसे पोहोचतील? जाणून घ्या समिकरण
- भारतीय क्रिकेट संघानं पुढील सामन्यात श्रीलंकेला हरवलं, तर अंतिम फेरीतील त्यांचं स्थान निश्चित होईल. यानंतर टीम इंडियाला बांग्लादेशसोबतही सामना खेळावा लागणार आहे, जो पुन्हा औपचारिक असेल.
- पाकिस्तानचा शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. जर पाकिस्ताननं हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत पाकिस्तान आणि टीम इंडिया यांच्या लढत होईल.
- पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांचे 3-3 गुण असतील. त्यानंतर नेट रन रेटवरुन निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत श्रीलंकेची फायनल्समध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. कारण पाकिस्तानपेक्षा श्रीलंकेचा नेट रनरेट चांगला आहे.
- पुढच्या सामन्यात श्रीलंकेनं भारताला हरवलं तर टीम इंडियाला बांग्लादेशला हरवून अंतिम फेरीत पोहोचण्याची पूर्ण आशा असेल. पण अंतिम फेरीसाठी पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकानं पराभव करावा लागेल.
आशिया चषकासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ
अब्दुल्ला शफीक, फखर जमां, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अशरफ, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह और शाहीन शाह आफरीदी.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)