India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) एकदिवसीय मालिकेला उद्यापासून अर्थात 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पण सामन्यांना अवघा एकदिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयनं केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे.

कसा आहे भारतीय संघ?

भारताचा एकदिवसीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारी  होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

कधी, कुठे पाहू शकता सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हे देखील वाचा-