India vs New Zealand 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 25 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. खेळाच्या तिसऱ्या दिवशी (3 नोव्हेंबर) भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य होते. मात्र, फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 121 धावा करू शकला. या विजयासह किवी संघाने मालिका 3-0 अशी खिशात घातली. न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला लेफ्ट आर्म स्पिनर एजाज पटेल, ज्याने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावातही 5 बळी घेतले होते.


भारताच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडले


तब्बल 24 वर्षांनंतर भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिकेत स्विप झाला आहे. याआधी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभव केला होता. तसेच, भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्विप झाला आहे. म्हणजेच भारतीय संघाचा हा पराभव अत्यंत लाजिरवाणा होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव झाला. त्यानंतर पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंडने 113 धावांनी जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती. 


आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली नाही हेच पराभवाचे कारण


कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला की, होय, तुम्हाला माहीत आहे, मालिका गमावणे, कसोटी गमावणे हे कधीच सोपे नसते, ही गोष्ट सहज पचनी पडत नाही. पुन्हा, आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही, आम्हाला ते स्वीकारावे लागेल. त्यांनी (न्यूझीलंड) संपूर्ण मालिकेत आमच्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली. आम्ही खूप चुका केल्या. आम्ही पहिल्या डावात (बेंगळुरू आणि पुण्यात) पुरेशा धावा केल्या नाहीत आणि आम्ही खेळात खूप मागे होतो, येथे आम्हाला 30 धावांची आघाडी मिळाली, आम्हाला वाटले की आम्ही पुढे आहोत. 


जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा माझ्या मनात काही कल्पना असतात, काही योजना असतात, पण या मालिकेत ते आले नाही आणि ते माझ्यासाठी निराशाजनक आहे. या खेळपट्टीवर (पंत, जैस्वाल आणि गिलवर) फलंदाजी कशी करायची हे त्यांनी दाखवून दिले. गेल्या 3-4वर्षात आपण अशा खेळपट्ट्यांवर खेळत आहोत, अशा खेळपट्टीवर खेळताना आपण थोडे पुढे राहणे आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. आम्हाला कसे खेळायचे (आणि चांगले खेळायचे) माहित आहे. पण ही मालिका आली नाही, काही गोष्टी (अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी कशी करायची) ज्या आल्या नाहीत आणि त्यामुळे दुखापत होईल. वैयक्तिक दृष्टिकोनातून, मी फलंदाजी आणि कर्णधार या दोन्ही बाबतीत माझ्या सर्वोत्तम कामगिरी करत नव्हतो. पण, आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली नाही आणि हेच या पराभवाचे कारण आहे.


इतर महत्वाच्या बातम्या