India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी (IND vs NZ) लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) नवीन निवड समिती न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) निवड करेल. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी-20 कारकिर्दीवर मोठा निर्णय घेईल. या दोघांशिवाय रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहची निवडही चर्चेचा विषय असणार आहे. दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर असलेला रवींद्र जाडेजा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.
3 वनडे, 3 टी-20 सामने खेळणार
न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार असून पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरी वनडे 21 जानेवारीला इंदूरमध्ये तर तिसरी वनडे 24 जानेवारीला रायपूरमध्ये होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारीला रांचीमध्ये, दुसरा सामना 29 जानेवारीला लखनौमध्ये तर तिसरा आणि शेवटचा T20 सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
संजू सॅमसन संघाबाहेर?
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी, निवडकर्ते रवींद्र जाडेजाच्या दुखापतीबद्दल NCA प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणशी फोनवर चर्चा करतील. तिथून मंजुरी दिल्यास जाडेजाची संघात निवड निश्चित आहे. जाडेजा संघात आला तर अशात संजू सॅमसनला बाहेर जावे लागेल. संजूशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. कारण बुमराहला पाठीचा त्रास आहे आणि त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेच्या एक दिवस आधी माघार घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
असा असू शकतो संघ?
भारताचा टी20 संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, रवींद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-