Team India: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया (Team India)पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि त्यामुळे संघ व्यवस्थापन बदलांचा विचार करू शकते. संघात कोणते बदल होऊ शकतात ते जाणून घेऊया.


या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते
न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश होण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसल्याने त्याला या सामन्यात वगळले जाऊ शकते. याशिवाय अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही पुढील सामन्यात स्थान मिळू शकते. अश्विन हा अनुभवी गोलंदाज असून पाकिस्तानविरुद्ध संघात अनुभवी गोलंदाजांची कमतरता असल्याचे दिसून आले.


अतिरिक्त फलंदाजावरही डाव लावू शकतात
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसारखे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये नसले तरी न्यूझीलंडविरुद्ध शमीला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. मात्र, भुवनेश्वर कुमारच्या जागी एका अतिरिक्त फलंदाजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या संघात स्थान मिळू शकते. टीम इंडिया 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह किवी संघाविरुद्ध मैदानात उतरू शकतो.


न्यूझीलंडविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.


3 फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता
या सामन्यातही फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी मिळाल्यास वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाहेर बसावे लागेल आणि भारतीय संघ पुन्हा 2 वेगवान गोलंदाज आणि 3 फिरकी गोलंदाजांच्या जोडीने मैदानात उतरेल. पुढील सामन्यात संघ कोणत्या रणनीतीने खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक


31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड  
नोव्हेंबर 8: नामिबिया वि भारत