David Warner Gave a Befitting Reply to Critics: ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे की लोक त्याच्या फॉर्मबद्दल बोलत आहेत. हे खूपच विचित्र आहे, कारण गेल्या काही महिन्यांत तो क्वचितच स्पर्धात्मक क्रिकेट खेळला आहे. तो म्हणाला की, आयसीसी टी-20 विश्वचषक खेळण्यापूर्वी मला याची काळजी नव्हती.


डेव्हिड वॉर्नरने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्सने दणदणीत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात त्याने 42 चेंडूत 65 धावा केल्या. या सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला की, मी आउट ऑफ फॉर्म आहे, हे म्हणणे खूप घाईचे आहे. वॉर्नर म्हणाला, "मला वाटतं की लोक माझ्या फॉर्मबद्दल बोलत आहेत. हे खूप विचित्र आहे. मी या प्रकरणावर हसतो. मी फार कमी क्रिकेट खेळलो आहे. मी आयपीएलमध्ये दोन सामने खेळलो आणि त्यानंतर सराव सामने, हे सराव सामने आहेत."


तो पुढे म्हणाला, "गुरुवारच्या सामन्यात मला साहजिकच नव्याने सुरुवात करायची होती. प्रत्येकजण माझ्या फॉर्मबद्दल बोलत होता, ज्याची मी काळजी करत नाही. यातून बाहेर पडणे आणि चांगली सुरुवात करण्याकडे मी लक्ष केंद्रीत केलं होते. आम्ही सर्व गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होतो."


25 ऑक्टोबर रोजी 35 वर्षांचा होणारा वॉर्नर म्हणाला की, श्रीलंकेविरुद्धची आपली खेळी टीकाकारांना शांत करण्यासाठी नव्हती. जेव्हा त्याला विचारले की टीकाकारांची तोंडे बंद झाली का? तर तो म्हणाला, "नाही, कधीच नाही. हे खेळाचे जग आहे. जेव्हा तुम्ही उंचीवर असता तेव्हा तुम्हाला या गोष्टींना तोंड द्यावेच लागते. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्मित ठेवावं लागेल आणि ते कधीही विसरू नका." अशा गोष्टींना तुमच्या जवळही येऊ देऊ नका."


आयपीएल 2021 मध्ये वॉर्नरची कामगिरी कशी होती?
आयपीएल 2021 च्या दोन्ही हाफ भागात वॉर्नरची बॅट शांत होती. याच कारणामुळे त्याला स्पर्धेच्या शेवटी प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. तसेच यापूर्वी खराब फॉर्म आणि काही चुकीच्या निर्णयांमुळे त्याला कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. IPL 2021 च्या आठ सामन्यांमध्ये वॉर्नरने 24.37 च्या सरासरीने आणि 107.73 च्या स्ट्राइक रेटने बॅटने फक्त 195 धावा केल्या.