IND vs NZ: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं न्यूझीलंडला (IND Vs NZ) तब्बल 372 धावांनी पराभूत केलंय. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केलाय. या विजयासह भारतानं कसोटी मालिका खिशात घातली. या सामन्यात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) चमकदार कामगिरी केलीय. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात अश्विननं चौथा विकेट्स घेऊन विक्रमाला गवसणी घातलीय. अश्विननं मायदेशात कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.


अश्विननं कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दित आतापर्यंत एकूण 426 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा अश्विन तिसरा गोलंदाज आहे. या यादीत अनिल कुंबळे 619 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, कपिल देव 434 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत तीन कसोटी सामने खेळणार आहे. या कसोटी मालिकेत अश्वननं नऊ विकेट्स घेतल्यास कपिल देवचा विक्रम मोडला जाईल. 





 


तसेच, भारताकडून कसोटीत क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरलाय. या यादीत भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या अव्वल स्थानी आहेत. कुंबळेंनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत मायदेशात 63 कसोटी सामने खेळले आणि 350 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अश्विननं आतापर्यंत भारतात 49 कसोटी सामने खेळले आहेत. हरभजन सिंहनं त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतात एकूण 265 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी 219 आणि रवींद्र जडेजानं घरच्या मैदानावर आतापर्यंत 162 विकेट्स घेतल्या आहेत.


अश्विन 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यानं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा ओलांडलाय. यासोबतच अश्विन एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. अश्विननं एका वर्षात 4 वेळा 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-