Virat Anushka Daughter Vamika : क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रमाणेच त्याची लहान मुलगी वामिका (Vamika) देखील खूप लोकप्रिय झाली आहे. विराट आणि अनुष्काने अद्याप मुलगी वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, विराट कोहलीचा एका लहान मुलीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये चाहते विराट कोहलीची मुलगी वामिका असल्याचा अंदाज बांधत आहेत.




मात्र, फोटोमधील ही चिमुकली विरुष्काची मुलगी नाही. विराटच्या मांडीवर त्याची मुलगी वामिका नाही, तर विराटचा हा फोटो बराच जुना आहे, जो त्याने यापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. विराट कोहलीच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी हिनाया आहे जी माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांची मुलगी आहे.




विराट अनुष्काची मुलगी वामिका 11 महिन्यांची आहे आणि या स्टार जोडप्याने अद्याप चाहत्यांना मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. तिच्या 6 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने आपल्या मुलीसोबत खेळतानाचे हे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अनुष्काला देखील तिच्या मुलीसह अनेकदा स्पॉट केले गेले आहे आणि तिने चाहत्यांसह अनेक छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. परंतु यामध्ये वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही.


विरुष्कानं इंस्टाग्रामवर वामिकाचा पहिला फोटो शेअर करत नाव जाहीर केले. मुलीच्या जन्मापासून अनुष्का आपला सगळा वेळ मुलीच्या संगोपनासाठी देत ​​आहे. विरुष्काचे वामिकासोबतचे फोटो चाहत्यांना पसंतीस उतरतात. त्यांचे वामिकासोबतचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. 


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha