IND vs NZ LIVE Score: टेबल टॉपवर कोण? भारत आणि न्यूझीलंडमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

ODI World Cup 2023, IND Vs NZ : विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज धरमशालाच्या मैदानात रंगतदार सामना होणार, यात शंकाच नाही.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 22 Oct 2023 10:13 PM
भारताचा न्यूझीलंडवर चार विकेटने विजय

भारताचा न्यूझीलंडवर चार विकेटने विजय

भारताला मोठा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. विराट कोहलीने 95 धावांवर बाद झालाय. 

विराट-जाडेजाची जोडी जमली

 


विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने 54 धावांची भागिदारी केली आहे. भारताला विजयासाठी 36 चेंडूत 29 धावांची गरज

भारताला विजयाठी 31 धावांची गरज

भारताला विजयासाठी 38 चेंडूत 31 धावांची गरज आहे.

सूर्या धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या नादात सूर्यकुमार यादव धावबाद झाला. भारताला पाचवा धक्का... भारताला विजयासाठी 97 चेंडूत 83 धावांची गरज आहे.

भाराताला विजयासाठी 88 धावांची गरज

भारताला विजयासाठी 17 षटकात 88 धावांची गरज

विराट कोहलीचे आणखी एक अर्धशतक

विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रे्लिया, अफगाणिस्ताननंतर आता न्यूझीलंडविरोधातही अर्धशतक झळकावले. 

केएल राहुल बाद

भारताला मोठा धक्का... केएल राहुल 27 धावांवर बाद झालाय. आता सर्व मदार विराट कोहलीवर

विराट-राहुलची अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. भारताला विजयासाठी 18 षटकात 92 धावांची गरज आहे.

भारताला विजयासाठी 100 धावांची गरज

पाचव्या विजयासाठी भारताला 19 षटकात 100 धावांची गरज आहे. विराट कोहली 43 तर केएल राहुल 24 धावांवर खेळत आहेत.

केएल राहुल - विराटची जोडी जमली

केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी 47 चेंडूत 37 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली 41 धावांवर खेळत आहे. 

भारताला तिसरा धक्का

श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. अय्यरने  29 चेंडूमध्ये 33 धावा करत बाद झाला. या खेळीत त्याने सहा चौकार लगावले.

सामन्याला पुन्हा सुरुवात

धुक्यामुळे थांबलेला सामना पुन्हा सुरु झाला आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आहेत. भारताला विजयासाठी अद्याप 174 धावांची गरज आहे. भारत 15.5 षटकात दोन बाद 100 धावा

धुक्यामळे खेळ थांबला

धरमशाला मैदानात मोठ्या प्रमाणात धूर आल्यामुळे खेळ थांबला आहे.





भारताचे शतक

गिल-रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी मोर्चा संभाळला आहे. दोघांनी भारताची धावसंख्या 100 पार नेली आहे.

विराट-श्रेयस मैदानावर

274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 11 षटकात 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही माघारी परतला. शुभमन गिल याने 31 चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. भारताला 80 धावांत दोन धक्के बसले आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर आहेत.

भारताला दुसरा धक्का

शुभमन गिलच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे. लॉकी फर्गुसनने शुभमन गिल याला बाद केले. 

भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावांवर बाद झाला. या खेळीत रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार मारले

रोहित-गिलची दमदार सुरुवात

274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली आहे. भारताने 11 षटकानंतर 71 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 39 चेंडूत 46 धावांवर खेळत आहे. यामध्ये चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. शुभमन गिल 27 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावांवर खेळत आहे. 

भारताची वादळी सुरुवात

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली आहे. 2 षटकात 15 धावा वसूल केल्या.

बुमराहचा भेदक मारा

जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरोधात कंजूष गोलंदाजी केली. बुमराहने 10 षटकात 45 धावा कर्च केल्या. यामध्ये एक षटक निर्धाव टाकले. शामीने एक विकेटही घेतली. बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या एकही षटकार मारता आला नाही.

शामीचा पंच

मोहम्मद शामी याने जबरदस्त कमबॅक केले. यंदाच्या विश्वचषकात पहिलाच सामना खेळणाऱ्या शामीने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. शामीने दहा षटकात 54 धावा खर्च केल्या. शामीच्या षटकात एक षटकार आणि सहा चौकार गेले.

भारताला विजयासाठी 274 धावांचे आव्हान

मोहम्मद शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांवर रोखले. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने 130 तर रचित रवींद्र याने 75 धावांची खेळी केली. शामीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा डाव 273 धावांत संपुष्टात आला. भारताला विजयासाठी 274 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

न्यूझीलंड ऑलआऊट

273 धावांत न्यूझीलंडचे सर्व फलंदाज तंबूत परतले.

शामीचा पंजा

मोहम्मद शामीने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले... डॅरेल मिचेलला केले बाद

तो आला तो गेला

मोहम्मद शामीने लागोपाठ दुसरी विकेट घेतली... शामीने मॅट हेनरीला केले त्रिफाळाचीत बाद.. न्यूझीलंडला आठवा धक्का

मोहम्मद शामीने जबराट विकेट घेतली

मिचेल सँटनरला मोहम्मद शामीने यॉर्करवर बाद केले. सँटनरने फक्त एक धाव केली. न्यूझीलंडला सातवा धक्का

सहावा धक्का

मार्क चैम्पमनच्या रुपाने न्यूझीलंडला सहावा धक्का बसलाय. 

मोहम्मद सिराजचा भेदक मारा

मोहम्मद सिराजने धरमशालाच्या मैदानावर भेदक मारा केली. सिराजने 10 षटकांमध्ये फक्त 45 धावा खर्च केल्या. यामध्ये एक षटकाही निर्धाव फेकले. सिराजने एक विकेटही घेतली. सिराजच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार गेला.

कुलदीपचा गोलंदाजी कोटा संपला

कुलदीप यादव आज महागडा ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कुलदीपच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. कुलदीपने 10 षटकात 73 धावा खर्च केल्या. त्याच्या षटकात तीन चौकर आणि 4 षटकार मारले गेले. पहिल्या चाप षटकात कुलदीपला प्रति षटक 10 ने धावा चोपल्या. पण अखेरीस कुलदीपने जोरदार कमबॅक केले. कुलदीप यादवने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.

अर्धा संघ तंबूत

न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. ग्लेन फ्लिपस याला कुलदीप यादवने बाद केले. ग्लेन फिलिप्सने 26 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले.

डॅरेल मिचेलचे झंझावती शतक

 


कठीण परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या डॅरेल मिचेल याने शतकी खेळी केली. त्याने 100 चेंडूमध्ये शतक ठोकले. डॅरेल मिचेल याने 4 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने शतक केले.

न्यूझीलंडला चौथा धक्का

अखेर कुलदीप यादवला विकेट मिळाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम पाच धावांवर बाद..न्यूझीलंड 4 बाद 205 धावा

अखेर विकेट मिळाली

मोहम्मद शामीच्या चेंडूवर रचित रवींद्र बाद झाला. शुभमन गिल याने कोणताही चूक केली नाही.. न्यूजीलंडला तिसरा धक्का.. 

भारताची खराब फिल्डिंग

भारतीय संघाने आज तिसऱ्यांदा झेल सोडला. रवींद्र जाडेजा, केएल राहुल यांच्यानंतर जसप्रीत बुमराहनेही झेल सोडला. कुलदीपच्या चेंडूवर मिचेल मोठा फटका मारला. सीमारेषावर असणाऱ्या बुमराहला झेलचा अंदाज आला नाही, अतिशय सोपा झेल सुटला

कुलदीप महागडा

भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज कुलदीप यादव आज महागडा ठरला आहे. कुलदीप यादवला 5 षटकात 48 धावा कुटल्या आहेत. कुलदीपच्या पाच षटकात 4 षटकार गेले आहेत.

जाडेजाचा स्पेल संपला

रवींद्र जाडेजाने 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. रवींद्र जाडेजाला एकही विकेट मिळाली नाही. रवींद्र जाडेजाने 10 षटकात 48 धावा खर्च केल्या. जाडेजाच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार गेले.

रचित रविंद्र अन् डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला

रचित रविंद्र अन् डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला आहे. 19 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर दोघांनीही खेळपट्टीवर स्थिरावरत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. रचित रविंद्र 74 तर मिचेल 69 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंड दोन बाद 167 धावा

न्यूझीलंडचे कमबॅक

रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी 100 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. 109 धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. डेवेन कॉनवेला सिरजने शून्यावर बाद केले होते. तर विल यंग याला शामीने 17 धावांवर बाद केले. 25 षटकानंतर न्यूझीलंडने दोन बाद 126 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी अर्धशतके केली आहेत.

रचित रविंद्रचे अर्धशतक

रचित रविंद्रचे अर्धशतक... 57 चेंडूमध्ये केल्यात 53 धावा

न्यूझीलंडचं कमबॅक

दोन विकेट झटपट गेल्यानंतर न्यूझीलंडने दमदार कमबॅक केलेय. डॅरेल मिचेल आणि रचित रविंद्र यांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आहे. 20.3 षटकात न्यूझीलंडने दोन बाद 98 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र 39 तर डॅरेल मिचेल 38 धावांवर खेळत आहेत.

न्यूझीलंडचे दोन फलंदाज तंबूत

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अर्धशतक फलकावर लावले आहे. 14 षटकानंतर न्यूझीलंड 2 बाद 56 धावा...

रोहित मैदानावर परतला

रोहित मैदानावर परतला आहे.. 

रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर

रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. केएल राहुल नेतृत्व करत आहे.





मोहम्मद शामीचा करिश्मा

मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर यंग बाद झालाय. मोहम्मद शामी विश्वचषकातील पहिलाच सामना खेळत आहे.

पॉवरप्लेमध्ये बुमराहचा भेदक मारा

विराट कोहलीने आजही गोलंदाजी करावी - रवि शास्त्री

अय्यरचा भन्नाट झेल

सिराज-बुमराहचा भेदक मारा

 


प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडच्या सलामी फलंदाजांना बांधून ठेवले. सिराजने कॉनवेला शून्यावर तंबूत पाठवले. 

भारताला पहिले यश

डेवेन कॉनवेला सिराजने पाठवले तंबूत... शून्य धावांवर कॉनवे तंबूत.... न्यूझीलंडला 9 धावांवर पहिला धक्का बसलाय

भारताच्या संघात दोन बदल

भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. त्याशिवाय शार्दूल ठाकूर याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शामी यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. दोघेही यंदाच्या विश्वचषकात प्रथम मैदानात उतरणार आहेत.

वनडेतील आकडेवारी काय - 

 


वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडला 50 सामन्यात विजय मिळाला आहे. सात सामन्याचा निकाल लागला नाही. आता रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

हेड टू हेड आकडे काय सांगतात ?

 


विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागल नव्हता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 1975 च्या विश्वचषकात झाला होता. तर अखेरचा सामना 2019 मध्ये झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. भारताने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचे 2003 मध्ये पराभूत केले होते. 


 

न्यूझीलंडची प्लेईंग 11: 

डेवोन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लेथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिशेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

भारताची  प्लेईंग 11:

 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज




 


भारतीय संघात दोन बदल

शार्दूल ठाकूर प्लेईंग 11 बाहेर... सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शामीला संधी

भारताची प्रथम फिल्डिंग

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

धरमशालाचे वातावरण स्वच्छ

धरमशालाचे वातावरण स्वच्छ आहे. पावसाची कोणताही शक्यता दिसत नाही. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक... 

हेड टू हेड आकडे काय सांगतात ?

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागल नव्हता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 1975 च्या विश्वचषकात झाला होता. तर अखेरचा सामना 2019 मध्ये झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. भारताने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचे 2003 मध्ये पराभूत केले होते. 

न्यूझीलंडविरोधात विश्वचषकात भारताची कामगिरी खराबच -

भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचं 2003 मध्ये पराभूत केले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला हरवलं होते. तेव्हा विराट कोहली 14 वर्षांचा होता, तर रोहित शर्मा 16 वर्षांचा होता. गौतम गंभीर आणि एमएस धोनीने तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन 20 वर्षांचा काळ ओलांडला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ न्यूझींलडला हरवणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे. 

विराट माझा आवडता खेळाडू - शुभमन गिल

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

आज कोण सामना जिंकणार ?

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या शानदार फॉर्मात आहेत. दोन्ही संघाने आतापर्तंयचे सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. दोन्ही संघ संतुलीत आहेत त्यामुळे आताच कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. जो संघ मैदानात सर्वोत्तम कामगिरी करेल, तोच विजयी होईल.  आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूझीलंडच्या फंलदाजीत किती दम ?

न्यूझीलंड संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावा चोपल्या आहेत. पण फलंदाजीमध्ये अनियमितता दिसत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ही कमजोरी पकडावी लागेल. न्यूझीलंडचे फलंदाज संयम सोडत नाहीत, चिवटपणे आपले काम करतात, हेही तितेकच महत्वाचे आहे. आज होणारा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. 

भारताच्या गोलंदाजीत किती दम ?

जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत भारतीय गोलंदाजीची ताकद वाढली आहे. भारतीय गोलंदाजी आक्रमक जिसत आहे. सिराज नंबर एक चा गोलंदाज आहे. फिरकीमध्ये रविंद्र जाडेजा आणि कुलदीप आपले सर्वोत्तम योगदान देत आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत चार सामन्यात एकाही संघाला 275 पेक्षा पुढे जाऊ दिलेले नाही. टीम इंडियाची गोलंदाजी संतुलीत आहे. 

आकडे भारताच्या बाजूने?

वनडे क्रिकेटमधील ओव्हरऑल हेड टू हेड आकडे भारताच्या बाजूने आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 58 तर न्यूझीलंड संघाने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडाचा संघ पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. 2023 च्या सुरुवातीला दोन्ही संघामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती, त्यामध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला.

न्यूझीलंडच्या फंलदाजीत किती दम ?

न्यूझीलंड संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावा चोपल्या आहेत. पण फलंदाजीमध्ये अनियमितता दिसत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ही कमजोरी पकडावी लागेल. न्यूझीलंडचे फलंदाज संयम सोडत नाहीत, चिवटपणे आपले काम करतात, हेही तितेकच महत्वाचे आहे. आज होणारा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. 

टीम इंडियाची ताकद काय  ?






पार्श्वभूमी

ODI World Cup 2023, IND Vs NZ : विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज धरमशालाच्या मैदानात रंगतदार सामना होणार, यात शंकाच नाही. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत आघाडीवर राहणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आतापर्यंत आपले चार चार सामने जिंकले आहेत. मागील 33 वर्षांतील आयसीसी स्पर्धेचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंडचे पारडे जड आहे. पण टीम इंडिया सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे सामना रोमांचक होईल. 


आकडे भारताच्या बाजूने?


वनडे क्रिकेटमधील ओव्हरऑल हेड टू हेड आकडे भारताच्या बाजूने आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 58 तर न्यूझीलंड संघाने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडाचा संघ पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. 2023 च्या सुरुवातीला दोन्ही संघामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती, त्यामध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला.


टीम इंडियाची ताकद काय  ?


फलंदाजी ही टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद आहे. भारतीय संघाचे आघाडीचे पाचही फलंदाज सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. रोहित शर्मा वादळी सुरुवात करतोय. तर विराट कोहलीची बॅटही तळपतेय. शुभमन गिल यंदा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलही लयीत दिसत आहे. त्यामुळे फलंदाजी पुन्हा एकदा टीम इंडियाची ताकद आहे. तळाला सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जाडेजा धावांचा पाऊस पडण्यात तरबेज आहेत. 


भारताच्या गोलंदाजीत किती दम ?


जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत भारतीय गोलंदाजीची ताकद वाढली आहे. भारतीय गोलंदाजी आक्रमक जिसत आहे. सिराज नंबर एक चा गोलंदाज आहे. फिरकीमध्ये रविंद्र जाडेजा आणि कुलदीप आपले सर्वोत्तम योगदान देत आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत चार सामन्यात एकाही संघाला 275 पेक्षा पुढे जाऊ दिलेले नाही. टीम इंडियाची गोलंदाजी संतुलीत आहे. 


न्यूझीलंडची ताकद काय ?


गोलंदाजी हा किवीचा मजबूत पक्ष आहे.. मॅट हेनरी आणि ट्रेंट बोल्ट या जोडीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना ध्वस्त केले आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात तरबेज आहेत. त्याशिवाय मिचेल सँटनरसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे, त्याच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक विकेटची नोंद आहे. 


न्यूझीलंडच्या फंलदाजीत किती दम ?
न्यूझीलंड संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावा चोपल्या आहेत. पण फलंदाजीमध्ये अनियमितता दिसत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ही कमजोरी पकडावी लागेल. न्यूझीलंडचे फलंदाज संयम सोडत नाहीत, चिवटपणे आपले काम करतात, हेही तितेकच महत्वाचे आहे. आज होणारा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. 


आज कोण सामना जिंकणार ?
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या शानदार फॉर्मात आहेत. दोन्ही संघाने आतापर्तंयचे सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. दोन्ही संघ संतुलीत आहेत त्यामुळे आताच कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. जो संघ मैदानात सर्वोत्तम कामगिरी करेल, तोच विजयी होईल.  आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.