India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 10 विकेट्स गमावत 255 धावा केल्या. त्यामुळे भारताला हा दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 359 धावांचं आव्हान असणार आहे. 


न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक 86 धावा केल्या. तर कॉनव्हेने 17, विल यंगने 23, रचिन रवींद्रने 9, मिचेलने 18, ब्लंडलने 41 धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट्स पटकावल्या. तर रवीचंद्रन अश्वीनने 2, रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. 






भारताला 359 धावांचे लक्ष्य-


डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सात विकेट घेतल्या. यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 156 धावांत आटोपला.  त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 103 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. आता दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 255 धावा केल्या असून भारताला 359 धावांचे लक्ष्य दिले आहे.






न्यूझीलंडचा पहिला डाव कसा राहिला?


पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 259 धावा केल्या. पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ 259 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट्स घेतल्या.


दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन-


यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.


दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन-


टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरुके.


संबंधित बातमी:


Ind vs Aus: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; वेगवान गोलंदाजांची तगडी फळी, केएल राहुलला संधी!


IND vs AFG: आशिया चषक स्पर्धेत मोठा उलटफेर; सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने टीम इंडियाला लोळवलं, फायनलचं तिकीट मिळवलं!