Ind vs Aus: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; वेगवान गोलंदाजांची तगडी फळी, केएल राहुलला संधी!
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात केएल राहुललाही संधी मिळाली आहे. राहुल अलीकडे त्याच्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.(Image Credit-BCCI)
जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल. टीम इंडियाने अभिमन्यू इसवरन आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही स्थान मिळवण्यात यश आले.(Image Credit-BCCI)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. (Image Credit-BCCI)
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यासोबत केएल राहुलला देखील संधी देण्यात आली आहे. (Image Credit-BCCI)
ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. टीम इंडियाने सर्फराज खानलाही संधी दिली आहे.(Image Credit-BCCI)
वेगवान गोलंदाजांची तगडी फळी- जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. भारताने मुकेश कुमार आणि नवदीप सैनी तसेच खलील अहमद यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. तर फिरकीपटूमध्ये वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे.(Image Credit-BCCI)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.(Image Credit-BCCI)