India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने आतापर्यंत आपली पकड मजबूत केली आहे. पण, न्यूझीलंडची सुरुवात एका वादळा सारखी झाली होती. संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी तुफानी फटकेबाजी करत टीम इंडियाच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. पण पहिली विकेट पडल्यानंतर टीम इंडियाने सामन्यात लवकर पुनरागमन केले. भारताला पहिली विकेट मिळवून देण्यात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेतला आणि फक्त 7.5 षटकांत 57 धावा केल्या. टीम इंडियाला यश मिळत नव्हते. या कारणामुळे कर्णधार रोहित शर्मा खूप गोंधळाला होता. अशा परिस्थितीत विराट कोहलीने रोहित शर्मासोबतचा आपला अनुभव शेअर केला आणि त्याला काही टिप्स दिल्या. यानंतर, पुढच्याच षटकात भारताला विल यंगची विकेट मिळाली. सामन्यादरम्यान विराट कोहली रोहित शर्माला टिप्स देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कुलदीप यादवने केला कहर...
या सामन्यात वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने विल यंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विल यंगने 23 चेंडूत 15 धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर न्यूझीलंड संघावर दबाव आला. यानंतर, खूप चांगला खेळणारा रचिन रवींद्र कुलदीप यादवच्या चेंडूवर आऊटझाला. कुलदीप यादवने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह 37 धावांची खेळी केली. कुलदीपच्या एका शानदार चेंडूने तो त्रिफळाचित झाला.
दोन विकेट गमावल्यानंतर, न्यूझीलंडला त्यांचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज केन विल्यमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, कुलदीप यादवचे हेतू वेगळे होते. त्याने केन विल्यमसनला स्थिरावण्याची संधी दिली नाही आणि त्याच्याच चेंडूवर त्याला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टॉम लॅथमलाही फक्त 14 धावा करता आल्या.
भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर किवी संघ 50 षटकांत सात विकेट गमावून 251 धावा करू शकला. शेवटच्या पाच षटकांत 50 धावा झाल्या, ज्यामुळे न्यूझीलंडला हा आकडा गाठता आला.
हे ही वाचा -