Varun Chakaravarthy Profile: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) स्पर्धेत पहिलाच सामना खेळला आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाला आपल्या फिकरीच्या जादूवर नाचवले. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट्स घेत सर्वांना आश्चर्यचकीत केले. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या एका निर्णयाने फिरकीपटू वरुण च्रकवर्तीचे (Varun Chakaravarthy) आयुष्य बदलले. आता मिस्ट्री स्पिनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत. या सात विकेट्सपैकी पाच विकेट्स एकाच सामन्यात आल्या. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत वरुण चक्रवर्तीने जगातील 143 गोलंदाजांना मागे टाकून मोठी झेप घेतली आहे. आता वरुण चक्रवर्तीने टॉप 100 मध्ये प्रवेश केला असून 97व्या स्थानावर पोहोचला आहे.


वरुण चक्रवर्तीची कारकीर्द-


वरुण चक्रवर्तीने एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर 18 टी-20 सामन्यात वरुण चक्रवर्तीने 33 विकेट्स पटकावल्या आहेत. तर आतापर्यंत आयपीएलच्या 70 सामन्यात वरुण चक्रवर्तीने 83 विकेट्स घेतल्या आहेत. 


गंभीरच्या एका निर्णयाने वरुण चक्रवर्तीचे बदलले आयुष्य-


वरुण चक्रवर्तीने जुलै 2021 मध्ये टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. पण त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट्स घेतल्या. यानंतर, 2021मध्ये वरुण चक्रवर्तीला कोणत्याही कारणाशिवाय भारतीय संघातून वगळण्यात आले. तो टीम इंडियाच्या प्लानमध्ये अजिबात नव्हता. पण गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच त्यांनी वरुण चक्रवर्तीला पुन्हा टी-20 संघात स्थान दिले. वरुण चक्रवर्तीने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आता तो एकामागून एक दमदार कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वरुण चक्रवर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला.


आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न, पण पुन्हा क्रिकेटकडे वळला-


29 ऑगस्ट 1991 रोजी कर्नाटकातील बिदर येथे जन्मलेल्या वरुण चक्रवर्तीचे आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न होते. वरुण चक्रवर्तीने वयाच्या 13 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळण्यापासून स्वतःला दूर केले आणि आर्किटेक्ट होण्याचा निर्णय घेतला. मग अभ्यासानंतर तो काम करू लागला आणि सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर तो नोकरी सोडून पुन्हा क्रिकेटकडे वळला.


संबंधित बातमी:


India vs New Zealand Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई; हवामान विभागाने वर्तवला धक्कादायक अंदाज