एक्स्प्लोर

IND vs NZ Final : फायनलची वेळ बदलली? जाणून घ्या दुबईमध्ये किती वाजता रंगणार भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने फक्त दुबईमध्ये खेळले. अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली, त्यापैकी एक लाहोर स्टेडियम आणि दुसरे दुबई स्टेडियम होते. पण सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचताच, आता स्पर्धेचा अंतिम सामना फक्त दुबईमध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामना किती वाजता होणार सुरू? 

आता अंतिम सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? पण, असे काहीही नाही आणि सामना नियोजित वेळेवर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक 2 वाजता होईल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने याच वेळी खेळले गेले आहेत.

आयसीसीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा

आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघ बाद फेरीत चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी किवी संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, त्यानंतर 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. पण, २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने या चारही सामन्यांमध्ये (तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरी) नेत्रदीपक विजय मिळवला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याशिवाय, न्यूझीलंड संघाला साखळी सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड हेड-टू-हेड रेकॉर्ड

आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 7 सामने अनिर्णीत राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget