India vs New Zealand 3rd Test : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी मिळून किवीजवर हल्लाबोल केला. भारताच्या या दोन युवा फलंदाजांनी धावांची आतषबाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. ऋषभ पंतने 59 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या काळात ऋषभ पंतने 101.69 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तर शुभमन गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. शुभमन गिलने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.  भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. टीम इंडियाला 28 धावांची आघाडी मिळाली आहे. 






न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 235 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. यशस्वी आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. रोहित 18 धावा करून बाद झाला. तर यशस्वी 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने मोहम्मद सिराजला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. मात्र तो शून्यावर बाद झाला.


कोहली-सर्फराज फ्लॉप


विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तर रवींद्र जडेजा 25 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. सर्फराज खानला खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर बाद झाला. रविचंद्रन अश्विन 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


शुभमन गिलचे शतक हुकले


भारताकडून गिलने दमदार फलंदाजी केली. मात्र त्याचे शतक हुकले. त्याने 146 चेंडूंचा सामना करत 90 धावा केल्या. गिलने या कालावधीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला एजाज पटेलने बाद केले. सुंदर अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने 36 चेंडूंचा सामना करत 38 धावा केल्या. या खेळीत वॉशिंग्टन सुंदरने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र, आकाश दीपला खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर बाद झाला.


न्यूझीलंडकडून इजाजने घेतल्या पाच विकेट 


न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच बळी घेतले. त्याने 21.4 षटकात 103 धावा दिल्या. मॅट हेन्रीने 8 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला. ग्लेन फिलिप्सने 20 षटकात 84 धावा देत 1 बळी घेतला. ईश सोधीलाही यश मिळाले.


हे ही वाचा -


Shubman Gill : वानखेडेवर एकटा नडला शेर शुभमन गिल, पण इतक्या धावांनी हुकले न्यूझीलंड विरुद्ध पहिले शतक