India vs New Zealand 3rd test match : वानखेडे स्टेडियमच्या कठीण खेळपट्टीवर भारताचा सलामीवीर शुभमन गिलने ज्या प्रकारची खेळी खेळली, ते अप्रतिम होते. परंतु न्यूझीलंड विरुद्ध त्याचे शतक हुकले. गिलशिवाय ऋषभ पंतनेही किवी संघाविरुद्ध आपली ताकद दाखवत अर्धशतक झळकावण्यात यश मिळवले.
गिलचे न्यूझीलंडविरुद्धचे शतक हुकले
मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला एजाज पटेलने आऊट केले. या डावात त्याने भारतासाठी शानदार 90 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 146 चेंडूंचा सामना केला आणि एक षटकार आणि 7 चौकारही मारले. जर गिलने त्याचे शतक पूर्ण केले असते, तर ते न्यूझीलंड संघाविरुद्ध त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक असते आणि त्याच्या एकूण कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील सहावे शतक ठरले असते. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीमध्ये गिलची ही आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. गिल त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत तिसऱ्यांदा 90 धावांवर बाद झाला.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या 25 व्या वर्षी गिलने नव्वदवर सर्वाधिक वेळा आऊट होण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली. या वयात कोहली नव्वदवर 3 वेळा बाद झाला होता आणि गिलसोबत हे घडले. नव्वदवर वयाच्या 25 व्या वर्षी सर्वाधिक वेळा आऊट होणार खेळाडू म्हणजे ऋषभ पंत आहे, ज्याच्यासोबत असे 6 वेळा घडले आहे.
वयाच्या 25 व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नव्वदवर सर्वाधिक बाद करणारा खेळाडू
6 – ऋषभ पंत
5 – सचिन तेंडुलकर – राहुल द्रविड
3 – विराट कोहली
3 - शुभमन गिल
हे ही वाचा -