IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून पुन्हा संजू सॅमसनला (Sanju Samson) वगळण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर वी वॉन्ट संजू (We want Sanju) ट्रेन्ड सुरू झालाय. चाहत्यांनी भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत (Team India Playing 11) प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघ व्यवस्थापनाच्या निर्णायाला बोट दाखवत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं 36 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारतीय संघाची धावसंख्या 306 पर्यंत पोहचली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा असल्याचं कारण देत कर्णधार शिखर धवननं (Shikhar Dhawan) संजू सॅमसनला बसवलं. महत्वाचं म्हणजे, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला खेळवलं जाईल, अशी शक्यता होती. पण दुसऱ्या सामन्यात अवघ्या 12.5 षटकांचा खेळ झाल्यानं संघ व्यवस्थापनानं प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.


ट्वीट






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


शिखर धवनचं स्पष्टीकरण
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला का वगळण्यात आलं होतं, त्यामागचं कारण शिखर धवननं सांगितलं. "आम्हाला सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा होता. म्हणून संजू सॅमसनला वगळावं लागलं आणि हुडाला संधी देण्यात आली. दीपक चाहरला संधी दिली. कारण तो चेंडू चांगल्याप्रकारे स्विंग करू शकतो. आमचे काही खेळाडू विश्रांती करत आहेत. पण तरीही संघ मजबूत आहे. यातून संघात किती सखोलता आहे, हे दिसते."


हे देखील वाचा-