IND vs NZ 3rd ODI: क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.  या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्यानं भारतीय संघ आजच्या सामन्यात मैदानात उतरेल. तर, दुसरीकडं न्यूझीलंडच्या संघाचा अखेरचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल.


क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला नाही. दुसरीकडं न्यूझीलंडच्या संघानं ब्रेसवेलऐवजी अॅडम मिल्नेला संघात स्थान दिलंय. भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी 55 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडच्या संघाला 50 सामन्यात विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडच्या मैदानावर भारताला 26 वेळा पराभव स्वीकारावा लागलाय.


ट्वीट-






 


ट्वीट-






 


संघ-


भारताची प्लेइंग इलेव्हन 
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (पंत), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.


न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: 
फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.


हे देखील वाचा-