IND vs NZ, Toss Update : दुसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी20 मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे.
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मोठी धावसंख्या करुन भारतावर प्रेशर आणण्याचा त्यांचा डाव आहे.त्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे भारत आधीच अंडरप्रेशर आहे. ज्यात आज नाणेफेकही भारतानं गमावली आहे. आता भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
2ND T20I. New Zealand won the toss and elected to bat. https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
खेळपट्टी पाहता प्रथम फलंदाजी फायद्याची
आजचा सामना होणाऱ्या लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. विषेश म्हणजे या क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेत किवी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारतीय संघाचा याठिकाणी विचार करता टीम इंडिया लखनौमध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 190+ धावा केल्या आहेत. भारताने येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. जर दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता न्यूझीलंडने आहे तोच संघ खेळवला असून भारताने केवळ एक बदल केला असून उमरान मलिकच्या जागी युजवेंद्र चहलला संधी दिली आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:
भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर.
हे देखील वाचा-