IND vs NZ 2ndT20 Live Streaming: सध्या भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिका (IND vs NZ T20 Series) खेळत आहे. पण भारताने पहिलाच टी20 सामना गमावल्यामुळे मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. जो भारताला जिंकणं अनिवार्य असेल, कारण भारताने आजचा सामना गमावला तर मालिकाही भारताच्या हातातून निसटणार आहे. भारताने मागील बऱ्याच द्वीपक्षीय टी20 मालिकांमध्ये पराभव पाहिलेला नाही, पण आजचा सामना गमावल्यास भारताची ही विजयी साखळी तुटू शकते. तर अशामध्ये भारतासाठीचा आजा हा महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊ... 


कधी होणार सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा टी20 (India vs New Zealand 2nd T20) आज अर्थात, 29 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 


कुठे आहे सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   



भारताचा टी20 संघ







हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 



भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head



भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Head to Head) या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. तर न्यूझीलंड संघाचा विचार करता त्यांनी 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत देखील सुटला आहे.






हे देखील वाचा-