IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज (27 नोव्हेंबर 2022) हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, मालिकेतील आव्हान जिंवत ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात गोलंदाजी निष्प्रभ झाली होती. त्यामुळं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 


भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर टॉम लॅथमचे नाबाद शतक आणि केन विल्यमसनच्या 94 धावांच्या खेळीमुळ किवी संघानं हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं 80 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या बॅटमधून अर्धशतक झळकली.


कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळवला जाईल. . भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग अमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे.  यासाठी तुमच्याकडं सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. याशिवाय, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात. 


भारताचा एकदिवसीय संघ: 
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपकुमार उम्मेद, चहलन मलिक, कुलदीप सेन.


न्यूझीलंड एकदिवसीय संघ: 
केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउदी.


हे देखील वाचा-