India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 177 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेल यांनी अर्धशतकं झळकावली असून भारतासाठी सुंदरनं 2 तर मावी, अर्शदीप आणि यादव याांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पण भारताकडून विकेटकीपर ईशान किशननं मारलेली थेट 'हिट' चांगलीच 'हिट' झाली आहे. न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेल याला बाद करताना ईशाननं स्टम्पसपासून काही दूरवरुन अप्रतिम थ्रो केला जो थेट स्टम्प्सना लागला आणि ब्रेसवेल एक धाव करुन तंबूत परतला.


न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान 18 वं षटक सुरु असताना अर्शदीप गोलंदाजी करत होता. त्याच्या एका चेंडूवर डॅरेल मिचेलनं मागच्या दिशेला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू कमी वेगातच मागे गेला. तोवर ईशाननं आपली पोजीशन बदलत चेंडूकडे धाव घेतली आणि नॉनस्ट्राईकवरील ब्रेसवेल क्रिजवर पोहोचण्याआधीच अफलातून थ्रो करत त्याला धावचीत केलं. ईशानच्या या रनआऊटचा व्हिडीओ बीसीसीआयनं देखील सोशल मीडियावर पोस्ट केला असून नेटकरी त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. विशेष म्हणजे मूळचा रांचीचा असणाऱ्या ईशानने त्याच्या होमग्राऊंडवर ही कमाल केल्याने त्याचे चाहते आणखीच आनंदी झाले आहेत. 


पाहा VIDEO-






भारतासमोर 177 धावाचं आव्हान


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं गोलंदाजी निवडली. ज्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉन्वे जोडीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरु केली. आधी फास्टर बोलर्सना थोडा चोप मिळाला, पण सुंदरने गोलंदाजीला मैदानात येत एकाच षटकात दोन विकेट्स घेत आधी फिन अॅलन (35) आणि मार्क चॅपमनला तंबूत धाडलं. डेव्हॉन कॉन्वे मात्र एका बाजून डाव सावरुन होता. त्यानंतर ग्लेन फिलिप्स 17धावा करुन बाद झाल्यावर डॅरेल मिचलनं कॉन्वेसोबत डाव सावरला. 35 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा करुन कॉन्वे बाद झाला. सँटनर (7), ब्रेसवेल (1) हे देखील स्वस्तात माघारी परतले. पण मिचेलनं अखेरपर्यंत नाबाद राहत 30 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 59 धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडनं 176 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर आता भारतीय संघ 177 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात येत आहे. 


हे देखील वाचा-